प्राथमिक आरोग्य केंद्र लवंग येथे कोरोना लस देण्यास सुरुवात
माजी सभापती पंचायत समिती माळशिरस सौ. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील
कोरोना लसीकरणाला सुरुवात
माळशिरस : प्रतिनिधी अहमद शेख
आज दि 10/03/2021 रोजी लवंग येथील शासकीय रुग्णालयात कोरोना लस देण्यास माजी सभापती पंचायत समिती माळशिरस सौ. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते यावेळी उदघाटन करण्यात आले. पहिली लस शहाजी चव्हाण कर्मचारी प्रा.आरोग्य केंद्र लवंग याना देऊन कोरोना लसीला सुरुवात करण्यात आली व गावातील वय वर्ष 45 पासून पुढे गंभीर आजार, शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना येऊन लस घ्या असे आव्हान करण्यात आले.
यावेळी सौ.सुनंदा फुले, जिल्हा परिषद सदस्य सोलापूर, डॉ.संतोष खडतरे वैद्यकीय अधिकारी लवंग, डॉ. प्रियांका साळुंखे वैद्यकीय अधिकारी लवंग, तसेच सर्व कर्मचारी तसेच श्री. शंकरतात्या कदम उपसरपंच लवंग, उत्तम बापू भिलारे, उत्तम भोसले, मधुकर वाघ, ज्ञानेश्वर वाघ, विनायक पराडे, बबन पवळ तसेच सर्व ग्रामस्थ लवंग उपस्थित होते
