खळद गावचा होणार कायापालट.. विविध विकासकामांसाठी सव्वा कोटींचा निधी.
आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी उपलब्ध.
यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले की आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळतो. गावच्या विकासकामांसाठी आम्ही नेहमीच अग्रेसर राहु. तसेच ज्या ज्या ठिकाणी विकासकामांसाठी निधी लागेल त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार निधी देऊ.
खळद : खळद, ता. पुरंदर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य श्री.योगेश कामथे, सौ.नम्रतामाई वि. कादबाने, सौ. शारदाताई कामथे, कु. आरती आबनावे यांनी दिलेल्या निवेदनाचा आमदार संजयजी जगताप, जि. प.सदस्य दत्ताशेठ झुरुंगे व प. स. सदस्या सुनीताकाकी कोलते यांनी अतिशय तत्परतेने विचार करून खळद गावच्या विकासकामांसाठी तत्परतेने निधी उपलब्ध करुन दिला.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नेहमीच गावच्या विकास कामांसाठी अग्रेसर असतात तसेच गावचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रयत्नशील असतात. यासाठी ते नेहमीच शासन व लोकप्रतिनिधी यांच्या कडे निधी साठी पाठपुरावा करतात याचेच फळ म्हणून खळद गावच्या विकास कामांसाठी सव्वा कोटींचा निधी मिळाला.
या निधीतून करण्यात येणारी कामे.
1. शिवरी कावडी मार्ग-75 लाख.
2. खळद फाटा ते गाव 45 लाख.
3. संत सेना मंदिर ते कऱ्हा नदी घाट पेव्हींग ब्लॉक 3 लाख.
4. दशक्रिया विधी घाट 3 लाख.
तसेच अंतर्गत नळ पुरवठा योजनेसाठीही निधी मंजुर झाला असुन ते काम लवकरच सुरु करण्यात येईल अशी माहिती जि. प सदस्य दत्ताशेठ झुंरंगे यांनी दिली यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री.योगेश कामथे, सौ.नम्रतामाई वि. कादबाने, सौ. शारदाताई कामथे, कु. आरती आबनावे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी उपसरपंच गणेश खळदकर, हरीभाऊ फुले, उत्तम कामथे , बाळा कादबाने, गणेश कामथे, गर्दीश कादबाने आदी उपस्थित होते.
