महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कोविड १९ लस प्राथमिक आरोग्य उप केंद्रावर तात्काळ उपलब्ध करा : सौ. लक्ष्मीबाई देशमुख.

कोविड १९ लस प्राथमिक आरोग्य उप केंद्रावर तात्काळ उपलब्ध करा : सौ. लक्ष्मीबाई देशमुख.
5 y 7 m 1 d 18 hrs 38 min 37 sec ago Nanded, Maharashtra, India

कौठा (जि. नांदेड):

कौठा ता.कंधार कोविड लस सध्या तालुक्यावरच उपलब्ध असुन ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकाना तालुक्यावर येणे-जाणे कठिण असुन यात कौठा परिसरातील नागरिकाना कंधार येणे-जाणे सोईस्कर नसल्याने येथील जेष्ठ नागरिकांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावरच लस उपलब्ध करुण देण्याची मागणी कंधार पंचायत समिती सदस्या सौ. लक्ष्मीबाई सजंय देशमुख यानी केली.

वाढती कोरोणा रुग्ण संख्या पाहता ग्रामीण भागातील कंधार तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेली शिरुर चौकी, महाकाया, राऊतखेड, धानोरा, तेलुर, काटकंळबा, जाकापुर, गोणार, येलुर, मंसलगा, राहाटी, वरवंट, बारुळ, कौठावाडी येथील जेष्ठ नागरिकाना कोविड लस घेण्यासाठी कंधार येथे येणे-जाणे सोईस्कर नसल्याने सदरील नागरिकांना कोविड लस प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावरच उपलब्ध करुन होणारी गैरसोय टाळण्याची मागणी पंचायत समिती सदस्या सौ. लक्ष्मीबाई देशमुख यानी केली आहे.

अनेक गोरगरिब, निराधार, वयस्कर नागरिकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे, त्यांना रस्त्यावर चालताना काठीचा आधार घ्यावा लागतो ते नागरिक कंधार येथे जाऊन कशी काय लस घेऊ शकतील. शासन आदेशा नुसार ६० वर्ष वयाच्या जेष्ठ नागरिकांना कोविड लस सर्व प्रथम देण्याचे आदेश असले तरी कर्मचारी वगळता कौठा परिसरात एकाही जेष्ठ नागरिकांना लस देण्यात आली नाही अथवा आरोग्य विभागा मार्फत त्यांना येजा करण्यासाठी कुठलीही सोय करण्यात आली नाही. सध्या सगळीकडे कोरोणा रुग्ण वाढत आहेत खबारदारीचा उपाय म्हणुन आरोग्य विभागाने तात्काळ प्राथमिक आरोग्य केन्द्र उपकेंद्रावर लस उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

जरी लस उपलब्ध झाली तरीही नागरिकांनी स्वत:सह आपल्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.

संबधित बातम्या